corona cases

जिल्ह्यात आज एका दिवसात ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत ८१३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा प्रथमच २.९५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये १२ हजार ५४६ इतके बेड आहेत. यात २१० आयसीयू बेड तर १ हजार ५७८ ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.

जळगाव : जिल्ह्यात (Jalgaon district) आज एकाच दिवशी (३१ ऑगस्ट) रोजी ५२३ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून आतापर्यंत १९ हजार ७३६ रुग्णांनी कोरोनावर मात (Cured) केली आहे. जिल्ह्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७१.५३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. जिल्ह्यात सध्या ७ हजार ४२ ॲक्टीव्ह रुग्ण (Active cases) विविध सेंटरमध्ये उपचार घेत असून पैकी २८१४ रुग्ण गृह अलगीकरणात आहेत. जिल्ह्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी आतापर्यंत १ लाख २७ हजार ३१२ संशयित रुग्णांचे स्वॅब तपासणीसाठी  घेण्यात आले आहेत. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात बाधित रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असून ही दिलासादायक बाब असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनातर्फे विविध उपापयोजना राबविण्यात येत आहे.

जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी दैनंदिन चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढविण्यात आली असून लक्षणे जाणवताच नागरीकांनी तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्यावतीने करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात आरटी-पीसीआरद्वारे ६५ हजार ८१४ तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टद्वारे ६१ हजार ४९८ अशा एकूण १ लाख २७ हजार ३१२ तपासण्या करण्यात आल्या आहेत. यापैकी ९८ हजार ४२८ चाचण्या निगेटिव्ह तर २७ हजार ५९१ चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असून ३९२ अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात सध्या ७ हजार ४२ बाधित रुग्ण उपचार घेत असून त्यापैकी कोविड केअर सेंटरमध्ये ३ हजार ११ रुग्ण, डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये ५७२, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ६४५ रुग्ण उपचार घेत आहेत. तर २ हजार ८१४ रुग्ण गृह अलगीकरणात उपचार घेत आहेत.

शिवाय विलगीकरण कक्षातही ३८० रुग्ण आहेत. उपचार घेत असलेल्या रुग्णांमध्ये लक्षणे नसलेले ५ हजार ८२५ रुग्ण असून लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १ हजार २१७ इतकी आहे. यापैकी ५४९ रुग्णांना ऑक्सिजन वायू सुरु असून १८१ रुग्ण हे आयसीयुमध्ये दाखल आहे. जिल्ह्यात आज एका दिवसात ४५६ पॉझिव्टिह रुगण आढळल्याने आतापर्यतच्या बाधित रुग्णांची संख्या २७ हजार ५९१ इतकी झाली आहे. यापैकी १९ हजार ७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात आज एका दिवसात ७ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असून आतापर्यंत ८१३ रुग्णांचा मृत्यु झाला आहे. जिल्ह्यातील बाधित रुग्णांचा मृत्युदर हा प्रथमच २.९५ टक्क्यांपर्यंत खाली आणण्यात प्रशासनास यश आले आहे. तसेच जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी सीसीसी व इतर रुग्णालयांमध्ये १२ हजार ५४६ इतके बेड आहेत. यात २१० आयसीयू बेड तर १ हजार ५७८ ऑक्सिजनयुक्त बेडचा समावेश आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय आढळून आलेले बाधित रुग्ण जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रुग्णांची संख्या २७ हजार ५९१ इतकी झाली आहे. यामध्ये जळगाव शहर ६२५३, जळगाव ग्रामीण १५०३, भुसावळ १५७९, अमळनेर २२८३, चोपडा २२९४, पाचोरा १०७६, भडगाव १२७०, धरणगाव १३०१, यावल ८९३, एरंडोल १५४०, जामनेर १८७७, रावेर १३५९, पारोळा १३६६, चाळीसगाव १६६०, मुक्ताईनगर ८१८, बोदवड ३७५, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात असलेल्या १४४ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या जळगाव शहर ४४०४, जळगाव ग्रामीण ८८६, भुसावळ ११०५, अमळनेर १५७९, चोपडा १५७९, पाचोरा ८४४, भडगाव १००८, धरणगाव ९३८, यावल ७६४, एरंडोल १२०७, जामनेर १३९५, रावेर ९८७, पारोळा ७८९, चाळीसगाव ११७४, मुक्ताईनगर ६३८, बोदवड ३१४, इतर जिल्ह्यातील १२५ याप्रमाणे एकूण १९ हजार ७३६ रूग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यात तालुकानिहाय उपचार घेत असलेल्या (ॲक्टिव्ह) रुग्णांची संख्या जिल्ह्यात सध्या उपचार घेत असलेले ७ हजार ४२ ॲक्टीव्ह रुग्ण आहेत. यामध्ये जळगाव शहर १६३२, जळगाव ग्रामीण ५६०, भुसावळ ३५०, अमळनेर ६४०, चोपडा ६६४, पाचोरा १८६, भडगाव २३२, धरणगाव ३२८, यावल ७१, एरंडोल ३०६, जामनेर ६४०, रावेर २५०, पारोळा ५६४, चाळीसगाव ४२८, मुक्ताईनगर ११८, बोदवड ५४, दुसऱ्या जिल्ह्यातील जळगाव जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या १९ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात तालुकानिहाय उपचारादरम्यान मृत्यु झालेल्या रुग्णांची संख्या जिल्ह्यात आतापर्यत उपचारादरम्यान ८१३ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. यामध्ये जळगाव शहर १६०, जळगाव ग्रामीण ५७, भुसावळ ८५, अमळनेर ६४, चोपडा ५१, पाचोरा ४६, भडगाव ३०, धरणगाव ३५, यावल ४७, एरंडोल २७, जामनेर ४६, रावेर ७०, पारोळा १३, चाळीसगाव ५८, मुक्ताईनगर १७, बोदवड ७ मृतांचा समावेश आहे. उपचारादरम्यान एकूण मृत्यु झालेल्या ८१३ रुग्णांपैकी ६९३ मृत्यु हे ५० पेक्षा जास्त वयोगटातील असून ४०१ मृत्यु हे आजारपण असलेले आहेत. जिल्ह्यातील ३ हजार १७३ ठिकाणे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित कोरोना बाधित रुग्ण आढळलेला भागाचे निर्जतुकीकरण करणे तसेच रुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी हा भाग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात येतो. त्यानुसार जिल्ह्यात आतापर्यंत ३ हजार १७३ ठिकाणे ही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १ हजार २५७, शहरी भागातील ९८६ तर जळगाव महापालिका क्षेत्रातील ९३० ठिकाणांचा समावेश आहे.

या क्षेत्रांचे सर्व्हेक्षण करण्यासाठी ४ हजार ५८६ टिम कार्यरत आहे. या क्षेत्रात २ लाख ११ हजार ८८२ घरांचा समावेश असून यात ९ लाख ६२ हजार ५८८ इतकी लोकसंख्येचा समावेश आहे. अशी माहिती डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक तथा नोडल ऑफिसर कोविड-१९, जळगाव यांनी दिली आहे. जिल्हावासियांनी शासनाच्या निर्देशांचे पालन करावे – पालकमंत्र्यांचे जिल्हावासियांना आवाहन जिल्ह्यातील नागरीकांनी कोरानाला घाबरु नये. परंतु जागरुक राहून कोणत्याही प्रकारची लक्षणे जाणवताच तातडीने आपल्या नजीकच्या रुग्णालयात जावून तपासणी करुन घ्यावी. जिल्ह्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा, जिल्हा परिषद, पोलीस, महसुल व नगरपालिका प्रशासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. तेव्हा नागरीकांनी शासनाच्या व जिल्हा प्रशासनाच्या निर्देशांचे पालन करावे. असे आवाहन पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले आहे.