जळगावात २४ तासात ४१८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

  • लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने जिल्ह्याबाहेरील लोक जिल्ह्यात परतल्याने कोरोना फोफावला आहे. २४ तासात जळगावात कोरोनाची ४२८ नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे.

जळगाव – राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. यामुळे राज्यातील सर्व जिल्ह्यात लॉकडाऊन केला आहे. तसेच जिल्ह्यांच्या सीमाही बंद करण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात सुरुवातीला कोरोनाचे जास्त रुग्ण नसल्याने जिल्ह्याची वाटचाल कोरोना मुक्तीकडे होती. परंतु लॉकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने जिल्ह्याबाहेरील लोक जिल्ह्यात परतल्याने कोरोना फोफावला आहे. २४ तासात जळगावात कोरोनाची ४२८ नव्या प्रकरणांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना  रुग्णांची एकूण संख्या ८६०५ वर गेली आहे. तसेच दिवसभरात १२ कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वेगाने वाढत असल्याने प्रशासन वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे.