Corona Virus Image

जळगाव : जळगाव  जिल्ह्यात आज दिवसभरात ४६५ रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ४५७७५ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ३६७३ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ४४३ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५०६६५ झाली असून आज पर्यंत १२१८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .

जळगाव : जळगाव  जिल्ह्यात(jalgav district) आज दिवसभरात ४४३ नवीन कोरोनाबाधित(corona) रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५०६६५ झाली आहे. आजपर्यंत १२१८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . आज दिवसभरात ४६५ रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले. जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ४५७७५ झाली आहे. जिल्ह्यात सध्या ३६७३ रूग्ण उपचार घेत आहेत.

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आज ४४३ नवे रूग्ण बाधित आढळून आले आहेत . यात जळगाव शहरातील ६३ आहेत.

तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी – जळगांव ग्रामीण ०९, भुसावळ २०, अमळनेर २२ , चोपडा १४ ,पाचोरा ०४,भडगाव ०६ ,धरणगाव ०३ , यावल ०७, एरंडोल ०७, जामनेर ११३ , रावेर १३ , पारोळा ०३,चाळीसगांव १५ , मुक्ताईनगर १४१, बोदवड ०,इतर जिल्ह्यातील ०३ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.