जळगावमध्ये ९८ कोरोना रुग्ण आढळले; दोन रुग्णांचा मृत्यू

जळगाव (Jalgaon) : आज गुरुवारी २२ ऑक्टोबर रोजी करोनाबाधित रुग्णांची संख्या जिल्ह्यात ९८ आढळली असुन दिवसभरात २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आता पर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५२३८८ झाली आहे. त्यापैकी ४९५७९ रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत १२५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १५५९ रुग्ण उपचार घेत आहेत. दिवसभरात बरे होणाऱ्यांची संख्या २२५ झाली आहे. तसेच जिल्ह्यात ९४.६४ टक्के रुग्ण बरे झाले आहेत. मृत्यूदर २. ३९ टक्क्यांवर आलेला आहे.

पॉझिटिव्ह आढळलेल्या व्यक्तींमध्ये जळगाव शहरातील ३८, जळगाव ग्रामीण ०, भुसावळ १३, अमळनेर ३, चोपडा ४,पाचोरा ३ , भडगाव १, धरणगाव १, यावल ३, एरंडोल ०, जामनेर ९, रावेर ११, पारोळा ०, चाळीसगाव ४, मुक्ताईनगर ४, बोदवड ३, इतर जिल्ह्यातील १ आहे. १५५९ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधित रूग्णांची संख्या गेल्या आठवड्यापासून घट्त असल्याने नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. धरणगाव तालुक्यात केवळ १२, पाचोरा तालुक्यात १४,भडगाव तालुक्यात १७, मुक्ताईनगर तालुक्यात १८, बोदवड तालुक्यात १९, पारोळा तालुक्यात २४ रुग्ण उपचार घेत असून हे तालुके कोरोना मुक्तीकडे जात आहे.