जळगाव जिल्ह्यात शनिवारी ९८६ नव्या कोरोनाबाधितांची नोंद, ४१८ जण कोरोनामुक्त

शनिवारी जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यात (corona patients in jalgav district)सध्या ७२७५ रूग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात ९८६ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६९६४८ झाली असून आजपर्यंत १४३८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे . 

    जळगाव:  जळगाव जिल्ह्यामध्ये (corona patients in jalgav district)कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. शनिवारी जिल्हा माहिती कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या ७२७५ रूग्ण उपचार घेत आहेत. आज दिवसभरात ९८६ नवीन कोरोनाबाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ६९६४८ झाली असून आजपर्यंत १४३८ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे .

    जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात ४१८ रूग्ण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. . जिल्ह्यात आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ६०९३५ आहे .

    जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात आज ९८६ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत . यात जळगाव ३५० शहरातील आहेत.

    तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी – जळगाव ग्रामीण २६ , भुसावळ ८९, अमळनेर ०२ , चोपडा १४१ ,पाचोरा ४६, भडगाव ०२ ,धरणगाव ३४, यावल ३२, एरंडोल ७९, जामनेर ७०, रावेर २४ ,पारोळा ३३ ,चाळीसगांव ०९, मुक्ताईनगर १८ , बोदवड ३१, इतर जिल्ह्यातील ०३ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.