जळगाव जिल्ह्यामध्ये कोरोनाचा उद्रेक, ९९६ नव्या रुग्णांची नोंद

जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग(corona patients in jalgav district) कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ९९६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत.

    जळगाव: जळगाव जिल्ह्यात(jalgav district) कोरोना वेगाने (corona patients in jalgav)पसरत असून आज दिवसभरात जिल्ह्यात तब्बल ९९६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. यात जिल्ह्यात सर्वत्र संसर्ग पसरत असल्याने प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

    जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कायम असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात तब्बल ९९६ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. तर याच कालावधीत ५३२ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

    आता रूग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणार्‍यांची संख्या देखील वाढू लागल्याची बाब दिसून आली आहे. यात जळगाव शहरात सर्वाधीक २१७ रुग्ण आढळून आले आहेत. तर धक्कादायक बाब म्हणजे चोपडा तालुक्यात एकाच दिवसात तब्बल १८१ रूग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. तर गेल्या चोवीस तासांमध्ये जिल्ह्यात सात कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला असून यामुळे आजवरच्या बळींची संख्या १४६२ इतकी झालेली आहे. तसेच जिल्ह्यात सध्या ८५५० रूग्ण कोरोनावर उपचार घेत असल्याची माहिती सुध्दा प्रशासनाने दिली आहे.

    जळगाव जिल्ह्यातील आजची आकडेवारी
    आज जळगाव शहर- २१७, जळगाव ग्रामीण-३, भुसावळ-४२, अमळनेर-९१, चोपडा-१८१, पाचोरा-६५, भडगाव-१९, धरणगाव-७८, यावल-४०, एरंडोल-५५, जामनेर-६०, रावेर-२१, पारोळा-२८, चाळीसगाव-५९, मुक्ताईनगर-२३, बोदवड-११ आणि इतर जिल्ह्यातून ३ असे एकूण९९६ बाधित रूग्ण आढळून आले आहे.

    जिल्हा रूग्णालयाने आज पाठविलेल्या कोरोना अहवालात जिल्ह्यात आजपर्यंत ७३ हजार ५७१ रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी ६३ हजार ५५९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर ८ हजार ५५० रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच ७ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.