पोळ्याच्या दिवशी कोसळला दुख:चा डोंगर; बैल धुण्यासाठी नदी आणि धरणावर गेलेल्या दोघांचा मृत्यू

औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी नदी आणि धरणावर गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला. औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील देवळी गावातील भास्कर ठोंबरे (45) पोळ्यानिमित्त सोमवारी सकाळी बैलाला धुण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र अचानक पाय घसरल्याने ते नदीत बुडाले. जळगावच्या एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील सागर ज्ञानेश्वर माळी हा 15 वर्षीय मुलगा पोळा सणाच्या निमित्ताने बैलांना अंघोळ घालण्यासाठी धरणावर गेला होता. बैलांची अंघोळ झाल्यानंतर सागर धरणात पोहायला लागला. मात्र धरणातील चिखलात पाय रुतल्याने तो बुडाला.

    जळगाव : औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्यात पोळ्याच्या दिवशी बैल धुण्यासाठी नदी आणि धरणावर गेलेल्या दोघांचा बुडून मृत्यू झाला.

    औरंगाबादच्या कन्नड तालुक्यातील देवळी गावातील भास्कर ठोंबरे (45) पोळ्यानिमित्त सोमवारी सकाळी बैलाला धुण्यासाठी नदीवर गेले होते. मात्र अचानक पाय घसरल्याने ते नदीत बुडाले. नदीपात्रातील खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे त्यांचा पाय घसरला. गावकऱ्यांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र बराच वेळ शोध घेतल्यानंतर त्यांचा मृतदेह हाती लागला. ऐन पोळ्याच्या दिवशी शेतकऱ्याचा असा नदीत वाहून मृत्यू होण्यामागे वाळुमाफिया जबाबदार असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

    जळगावच्या एरंडोल तालुक्यातील खर्ची येथील सागर ज्ञानेश्वर माळी हा 15 वर्षीय मुलगा पोळा सणाच्या निमित्ताने बैलांना अंघोळ घालण्यासाठी धरणावर गेला होता. बैलांची अंघोळ झाल्यानंतर सागर धरणात पोहायला लागला. मात्र धरणातील चिखलात पाय रुतल्याने तो बुडाला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर काही लोकांनी त्याला बाहेर काढले. उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला.