रक्षा खडसे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात खडाजंगी, शब्दाने शब्द वाढत गेला आणि…

जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडमध्ये सीसीआय केंद्राच्या उद्घाटनाचा आणि कापूस खरेदीच्या शुभारंभाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला यायला आ. चंद्रकांत पाटील यांना उशीर झाला. त्यामुळे ते येण्याआदीच खा. रक्षा खडसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा उद्घाटन करण्यात आलं. आमदार चंद्रकांत पाटील यांना त्याचा राग आला.

जळगावमध्ये भाजपच्या खासदार रक्षा खडसे आणि मुक्ताईनगरचे शिवसेना सहयोगी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यात जोरदार खडाजंगी रंगली. एका साध्या कारणावरनं सुरू झालेल्या मुद्द्याला कधी बाचाबाचीचं रूप आलं ते कळलंदेखील नाही.

जळगाव जिल्ह्यातल्या बोदवडमध्ये सीसीआय केंद्राच्या उद्घाटनाचा आणि कापूस खरेदीच्या शुभारंभाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला यायला आ. चंद्रकांत पाटील यांना उशीर झाला. त्यामुळे ते येण्याआदीच खा. रक्षा खडसे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा उद्घाटन करण्यात आलं. आमदार चंद्रकांत पाटील यांना त्याचा राग आला.

उद्घाटनासाठी थोडं थांबता आलं असतं, असं म्हणत त्यांनी आपली नाराजी आणि राग व्यक्त केला. तर कार्यक्रमाची वेळ सकाळी १० ची असल्यामुळे वाट पाहून मगच उद्घाटन करण्यात आल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं. त्यावर आमदार पाटील यांनी पुन्हा रक्षा खडसेंवर पलटवार केला. मला आधी सांगितलं असतं तर तुम्हीच कार्यक्रम घेतला असता, असा टोला त्यांनी लगावला.

एकनाथ खडसे आणि आमदार चंद्रकांत पाटील हे एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे यांचा चंद्रकांत पाटील यांनी पराभव केला होता.

खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची नाराजी

भाजपला सोडचिठ्ठी देऊन खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेत. यामुळं राष्ट्रवादीचा जिल्ह्यातला आणि खान्देशातला प्रभाव वाढणार असला, तरी शिवसेनेच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. यामुळे भविष्यात मोठा राजकीय संघर्ष उभा राहण्याची शक्यता आहे. आपण एकनाथ खडसेंच्या मुलीला हरवून विजयी झालो असताना, महाविकास आघाडीत खडसेंना प्रवेश देतेवेळी आपल्याला विचारात घेतलं नसल्याची तक्रार चंद्रकांत पाटील यांची आहे.