तरुणाचा भर रस्त्यात खून, कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा

जळगावातील शिवाजीनगर भागात इंद्रप्रस्थ नगर परिसरातील खडकेचाळीजवळ एका २५ वर्षीय तरुणाचा अज्ञात तीन जणांनी चाकूने हल्ला करून खून केल्यामुळे पुन्हा खळबळ उडाली आहे. शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून घटनास्थळावर प्रचंड गर्दी जमली आहे. तीन मारेकऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

जळगाव : मयत तरुण भूषण भरत सोनवणे (२५) हा इंद्रप्रस्थ नग परिसरातील सिध्दीविनायक पार्क जुना कानळदा रोड येथील रहिवासी होता.  रात्री 11.30 च्या सुमारास अतुल काटकर, प्रतिक निंबाळकर (रा. सिध्दीविनायक पार्क) व दुर्गेश उर्फ पपई आत्माराम संन्यास (रा. गेंदालाल मिल, जळगाव) या तिघांनी चाकूने सपासप वार करून तसेच दगडाने मारून निर्घृण हत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती. तत्काळ शहर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. मयत भूषण सोनवणे याचा मृतदेह बराच वेळ घटनास्थळी होता. त्याची आई अँब्युलस येत नाही तोवर मृतदेहाजवळ बसून होती. नंतर १०८  अँब्युलस मध्ये भूषणला देवकर काँलेज येथील सिव्हिल शासकीय दवाखान्यात नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी मयत घोषित केल्यानंतर आई तिरोणा भरत सोनवणे सह नातेवाईकांनी आक्रोश केला. यानंतर जळगाव शासकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आले. यावेळी हाँस्पिटल जवळ मोठी गर्दी जमा झालेली होती.

भरत याच्या पश्चात लहान भाऊ, तीन बहिणी, आई असा परिवार आहे. घटनास्थळी अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी,  साहाय्यक पोलीस अधिक्षक कुमार चिंथा यांनी धाव घेत पाहणी केली आणि तत्काळ तीन संशयित मारेकऱ्यांना ताब्यात घेतले आहे.  आई तिरोणा भरत सोनवणे यांच्या फिर्यादीवरून जळगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.