missing

वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे अमळनेर (amalner) नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड(sandip gayakwad) यांनी व्यथित होऊन स्वतःला जाळून घेण्याचा इशारा दिला आहे.

    अमळनेर : वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आदेश देऊनही पोलीस निरीक्षकांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे अमळनेर (amalner) नगर परिषदेचे उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड(sandip gayakwad) यांनी व्यथित होऊन स्वतःला जाळून घेण्याचा इशारा दिला आहे. काल रात्रीपासून ते बेपत्ता(sandip gayakwar missing) झाले आहेत. त्यांचा भ्रमणध्वनी बंद आहे. त्यांच्या पत्नीने पोलिसात ते हरवल्याची नोंद केली आहे.

    महाराष्ट्र शहर विद्रूपण कायद्यानुसार बेकायदेशीर फलक काढण्यावरून शहरात उपमुख्याधिकारी व जैन समाजाच्या लोकांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर त्या वादाला सामाजिक रंग चढला आणि धार्मिक भावना दुखावल्याचे निमित्त करून जैन समाजाने प्रांत, तहसील व पोलीस स्टेशनला मोर्चा काढला. संदीप गायकवाड व तीन कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल केला. उपमुख्याधिकारी संदीप गायकवाड यांनीही त्यांना धक्का बुक्की , मारहाण व शिवीगाळ करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन गाठले. मात्र बरेच तास उलटूनही पोलीस निरीक्षक गुन्हा दाखल करत नव्हते. त्यामुळे गायकवाड यांनी आय जी, अप्पर पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार केली. त्यांनी पोलीस निरीक्षकांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत, असे सांगितले.

    इतके सगळे होऊनही पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून संदीप गायकवाड यांनी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास फेसबुकवर लाईव्ह पोस्ट टाकून शहरातील काही व्यक्तींची नावे घेऊन पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही म्हणून स्वत:ला पेटवून टाकण्याचा इशारा दिला.

    त्यांनी फेसबुकवर इशारा देताना म्हटले आहे की, मी माजी सैनिक आहे. वरिष्ठांच्या आदेशाने मी नगरपालिकेचे काम करत होतो. माझे काम करत नव्हतो. मला मारहाण झाली शिवीगाळ केली. माझा गुन्हा कोणी दाखल करत नव्हते आय जी व अप्पर पोलीस अधीक्षकांनी सांगूनही गुन्हा दाखल होत नसेल, न्याय भेटत नसेल तर मेलेले बरे. मी पेट्रोल टाकून जाळून घेतो.