BHR Scam

भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर पतसंस्थेत(BHR Scam) अवसायक नियुक्तीनंतर झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

    जळगाव : बीएचआर गैरव्यवहार(BHR  Scam) प्रकरणात अनेक दिग्गजांच्या अटकेनंतर गुन्ह्याच्या तपासात विधान परिषद सदस्य चंदू पटेल(Chandu Patel) यांचेही नाव नंतर समाविष्ट करण्यात आले आहे. त्यांच्या अटकेसाठी पुणे पोलीस मागावर आहेत. पटेलांविरुद्ध अटक वॉरंट जारी(Arrest Warrent Issued Against Chandu patel) करण्यात आले आहे.

    भाईचंद हिराचंद रायसोनी अर्थात, बीएचआर पतसंस्थेत अवसायक नियुक्तीनंतर झालेल्या कथित गैरव्यवहारप्रकरणी पुणे येथील डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुणे पोलिसांची आर्थिक गुन्हे शाखा त्याचा तपास करत आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२०मध्ये पहिल्या टप्प्यातील अटकेनंतर दुसऱ्या टप्प्यात गेल्या महिन्यात डाळ उद्योजक प्रेम कोगटा, हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, जामनेरातील गिरीश महाजनांचे कार्यकर्ते जितेंद्र पाटील यांच्यासह ११ जणांना अटक करण्यात आली.

    गेल्यावर्षीच या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याचा तपास जसा पुढे सरकत आहे, तशी संशयितांची यादी वाढत असून आरोपी वाढत आहेत. त्यासाठीच दुसऱ्या टप्प्यातील अटक सत्र झाले. त्याचवेळी या गुन्ह्यात विधान परिषद सदस्य भाजप आमदार चंदू पटेल यांचे नाव समाविष्ट झाले होते. ज्यावेळी भंगाळे, कोगटा, तोतला आदी मंडळींना अटक झाली, तेव्हाच पटेल यांच्याविरोधात अटक वॉरंटही जारी करण्यात आले होते. पुणे पोलिसांचे पथक त्यांच्या निवासस्थानीही जाऊन आले, मात्र त्याआधीच पटेल फरारी झाले होते.

    अन्य राज्यांत तपास

    पटेल हे त्या दिवसापासूनच फरारी असून त्यांच्या तपासार्थ पुणे पोलिसांची पथके विविध ठिकाणी छापे मारत आहेत. तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारेप्रमाणेच पटेल यांनीही अन्य राज्यात आसरा घेतला असल्याचे सांगितले जात आहे.