देवेंद्र फडणवीस खडसेंच्या घरी; घेतली सुनबाईंची भेट

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने चर्चांना ऊत आला होता. सोमवारी शरद पवारांची भेट आणि त्यानंतर खडसेंच्या घरी जाणे या दोन्ही गोष्टी जोडून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी खडसेंच्या सून तसेच भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

    जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी जळगाव दौऱ्यात एकनाथ खडसे यांच्या घरी सदिच्छा भेट दिल्याने चर्चांना ऊत आला होता. सोमवारी शरद पवारांची भेट आणि त्यानंतर खडसेंच्या घरी जाणे या दोन्ही गोष्टी जोडून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्यांनी खडसेंच्या सून तसेच भाजपा खासदार रक्षा खडसे यांच्यासह इतर भाजप पदाधिकाऱ्यांची भेट घेतली.

    मान्सूनपूर्व वादळी पावसाने जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर व रावेर तालुक्यात थैमान घातले होते. यात केळी बागांसह घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. फडणवीस या नुकसानीची पाहणी करण्यासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते.

    डॅमेज कंट्रोलची गरज आम्हाला नाही तर महाविकास आघाडी सरकारला आहे असे विधानही फडणवीस यांनी यावेळी केले. त्यांच्याविरोधात रोज होत असलेले आरोप, रोज होणाऱ्या चुकीच्या गोष्टी यामुळे त्यांचेच डॅमेज झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.