1200 ते 1300 रुपये क्वींटल दराने विकली जात आहेत केळी, पिकाला येणार सुगीचे दिवस

“मागील वर्षी लॉकडाउन आणि CMV या केळीवरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन कमी होतं. त्यामुळे दरही कमी मिळत होता. पण आता तसं काही नाही. त्यामुळे पैसे देखील मिळत आहेत.” अशी प्रतिक्रिया केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.

  जळगाव जिल्ह्यातील तापी पट्टा हा केळी उत्पादक म्हणून ओळखला जातो. गेल्या वर्षापासून केळीला कोरोनामुळे योग्य भाव मिळत नव्हता, परंतु गेल्या दोन महिन्यापासून केळीला चांगल्याप्रकारे भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमधे आनंदाचे वातावरण आहे.

  लॉकडाउनच्या काळात केळीला 350 रुपयाचा क्वींटल इतकाच भाव मिळत होता. यातून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नव्हता. परंतु, गेल्या दोन महिन्यांपासून केळीला बाराशे ते तेराशे रुपयाचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

  याबाबत बोलताना स्थानीक शेतकरी गौरव कापसे म्हणाले की, “मागील वर्षी लॉकडाउन आणि CMV या केळीवरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादन कमी होतं. त्यामुळे दरही कमी मिळत होता. पण आता तसं काही नाही. त्यामुळे पैसे देखील मिळत आहेत.” अशी प्रतिक्रिया केळी उत्पादक शेतकऱ्यांनी दिली आहे.

  लॉकडाउनमधे केळीला मागणी पण..

  कोरोनाचा प्रादुर्भाव कमी व्हाया यासाठी सरकारने लॉकडाउन जाहिर केले. याच काळात केळीला प्रचंड खप होता. पण, CMV या केळीवरील रोगाच्या प्रादुर्भावामुळे उत्पादनात प्रचंड घट झाली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता.

  मात्रा आता केळीला चांगला दर मिळत असून जळगावची केळी दिल्लीत जात आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा पिकाला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे.