एकनाथ खडसे यांना खासदार रक्षा खडसेंनी दिल्या वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा

“मी परिवार म्हणून नेहमी त्यांच्या सोबत आहे. आम्ही सर्वांनी रात्रीच त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणखी त्यांच्या कडून समाज सेवा घडो. हीच देवाकडे प्रार्थना करते.” अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली.

    जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा आज वाढदिवस आहे. या निमित्ताने सकाळ पासून कार्यकर्त्यांची व पदाधिकाऱ्यांची त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मुक्ताईनगर येथील फार्म हाऊसवर गर्दी केली आहे.

    आज सकाळपासून एकनाथ खडसे यांच्या फार्महाऊसवर ते ढोल-ताशांचा गजर करण्यात येत आहे. फार्म हाऊस बाहेर खडसे समर्थकांनी परिसरात मोठमोठे पोस्टर लावले आहेत. एकनाथ खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांच्या निवासस्थानी केक कापण्यात आला.

    खासदार रक्षा खडसे यांनी दिल्या शुभेच्छा

    एकनाथ खडसे यांना खासदार रक्षा खडसे यांनी वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा आहेत. मुक्ताईनगर येथील हाऊसवरजाऊन एकनाथ खडसे यांच्या सून खासदार रक्षा खडसे यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या की, “मी परिवार म्हणून नेहमी त्यांच्या सोबत आहे. आम्ही सर्वांनी रात्रीच त्यांचा वाढदिवस साजरा केला. त्यांना दीर्घायुष्य लाभो आणखी त्यांच्या कडून समाज सेवा घडो. हीच देवाकडे प्रार्थना करते.” अशी प्रतिक्रिया रक्षा खडसे यांनी दिली.