bjp devendra fadanvis on eknath khadse allegations

महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळेच गिरीश महाजन यांच्या घरी गुप्त बैठक बोलावली आहे. गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत. त्यांच्यासोबतच काही आमदार आहेत. त्यांच्यात बैठक सुरु झाली आहे.

जळगाव : भाजपचे  (BJP) ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) हे राष्ट्रवादीच्या वाटेवर आहे. खडसे मागील कित्येक महिन्यांपासून भाजपवर नाराज आहेत. त्यांची मनधरणीही भाजपच्या दिग्गज नेत्यांनी केली आहे. परंतु खडसेंची नाराजी दुर झाली नाही आहे. मागील काही दिवसांपासून खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती मिळत आहे. या चर्चेमुळे भाजपच्या गोटात खळबळ माजली आहे. भाजपा नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या घरी भाजपाची बैठक बोलावण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यामुळेच गिरीश महाजन यांच्या घरी गुप्त बैठक बोलावली आहे. गिरीश महाजन यांच्या बंगल्यावर देवेंद्र फडणवीस पोहोचले आहेत. त्यांच्यासोबतच काही आमदार आहेत. त्यांच्यात बैठक सुरु झाली आहे.

देवेंद्र फडणवीस जळगावमध्ये जामनेर येथे ग्लोबल महाराष्ट्र रुग्णालयाचे उद्घाटनासाठी गेले आहेत. तर जामनेरमध्ये एकनाथ खडसेंचे समर्थकही आक्रमक झाले आहे. समर्थकांकडून सोशल मीडियावर एकनाथ खडसेंचा फोटो व्हायरल करुन आमचा नेता आमचा अभिमान अशाप्रकारे समर्थन दर्शवले आहे. देवेंद्र फडणवीसांच्या जळगाव दौऱ्यामुळे जळगावात वातावरण चांगलेच तापले आहे.