एकनाथ खडसेंना दोन महिन्यात तीनवेळा कोरोना कसा काय झाला? शास्त्रज्ञांनी संशोधन केलं पाहिजे: गिरीश महाजनांची खोचक टिप्पणी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. यावरुनच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर खोचक टिप्पणी केली आहे.

    जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. यावरुनच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर खोचक टिप्पणी केली आहे.

    माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी असे मी म्हणणार नाही. पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे असा टोला महाजनांनी लगावला.

    संपूर्ण राज्यात कोरोना आहे. पण आमच्या जळगाव जिल्ह्यात वेगळ्याच प्रकाराच कोरोनाचा विषाणू आढळून आला आहे. एका व्यक्तीला तीन-तीन वेळा त्याची लागण होत आहे. असे म्हणत महाजनांनी एकनाथ खडसे यांना वारंवार कोरोनाची लागण होत असल्याविषयी शंका उपस्थित केली आहे.