girish mahajan

पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे पदाधिकारी म्‍हणून महाजन हे गेल्‍या पंधरा-वीस दिवसांपासून पश्‍चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. कोरोना काळात मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून ते बंगालला निघून गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी हातात कागदी बॅनर झळकवून ‘जामनेरचे आमदार गिरीश महाजन दाखवा आणि दहा लाख रुपये बक्षीस मिळवा’, असे उपरोधिक आवाहन जनतेला केले.

    जळगाव : पश्‍चिम बंगालमध्ये निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपचे पदाधिकारी म्‍हणून महाजन हे गेल्‍या पंधरा-वीस दिवसांपासून पश्‍चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. कोरोना काळात मतदारसंघातील जनतेला वाऱ्यावर सोडून ते बंगालला निघून गेल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांनी हातात कागदी बॅनर झळकवून ‘जामनेरचे आमदार गिरीश महाजन दाखवा आणि दहा लाख रुपये बक्षीस मिळवा’, असे उपरोधिक आवाहन जनतेला केले.

    जनतेची काळजीच नाही

    राज्यभरात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे. अशावेळी प्रत्येक आमदार, खासदार आपापल्या मतदारसंघामध्ये जनतेची आवश्यक ती मदत करण्यात गुंतलेले असताना येथील आरोग्यदूत म्हणविणारे माजी मंत्री व आमदार गिरीश महाजन मात्र बंगालमध्ये प्रचार करण्यात मग्न आहेत. त्यांनी जनतेला वाऱ्यावर सोडून पक्षहित जास्त जोपासल्याचे दिसते, असाही टोमणा या वेळी किशोर पाटील यांनी आंदोलनादरम्यान लगावला.

    गेल्या आठवड्यात झाले होते आंदोलन

    गेल्या आठवड्यातही संजय गरुड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतही आमदार महाजन कोरोना संकटकाळात जनतेला वाऱ्यावर सोडून मतदारसंघातून गायब झाले, असा आरोप केला होता. आता पुन्हा राष्ट्रवादीच्याच काही पदाधिकाऱ्यांनी विधानसभा क्षेत्रप्रमुख किशोर पाटील यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राजमाता जिजाऊ चौकामध्ये आंदोलन केले. या वेळी संदीप हिवाळे, विनोद माळी, शहराध्यक्ष जितेश पाटील आदी पदाधिकारी होते.