BJP medical front with Bhole demands allow doctors to use weapons
डॉक्टरांना शस्त्र वापरण्याची परवानगी द्या ; आ. भोळेंसह भाजप वैद्यकीय आघाडीची मागणी

भुसावळ शहरात डॉक्टरांना खंडणी मागितल्याचे प्रकरण आणि सावदा येथील रुग्णालयाची तोड-फोड केल्याप्रकरणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीतर्फे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले. डॉक्टरांना संरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

  • गजानन हॉस्पिटल सावदा, तोड फोड प्रकरणी आरोपींना तात्काळ अटक करा

जळगाव : भुसावळ शहरात डॉक्टरांना खंडणी मागितल्याचे प्रकरण आणि सावदा येथील रुग्णालयाची तोड-फोड केल्याप्रकरणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीतर्फे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांना निवेदन देण्यात आले. डॉक्टरांना संरक्षणासाठी शस्त्र परवाने देण्यात यावेत अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदन देताना आ. सुरेश भोळे, डॉ. धर्मेंद्र पाटील, डॉ. नरेंद्र ठाकूर, डॉ. नितु पाटील, डॉ. जीवन पाटील आदी उपस्थित होते. निवेदनात पुढे म्हटले आहे की, “ ये हमारा एरिया है,आपको यहा हॉस्पिटल चलना है, तो हमे हप्ता देना पडेगा,नही तो अस्पताल बंद कर देंगे,” अशी धमकी भुसावळ मधील सुप्रसिद्ध फिजिशियन डॉ.स्वप्नील कोळंबे यांना दि.१२ ऑक्टोबरला देण्यात आली आणि नंतर सतत धमकावण्यात आले. तरी यासंबंधी दि.२१ ऑक्टोबर ला भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात “ खाकीचा धाक आता ओसरत चालला आहे…” असं काहीसं चित्र तयार होत आहे,किमान प्रत्येक आठवड्यात खून,विनयभंग,दरोडा,चोरी,बलात्कार,मारामारी आदी घटना नित्याच्या झाल्या असून आता तर डॉक्टर मंडळींना दिवसाढवळ्या धमकी देणे. खंडणी मागणे नाही तर जीवे मारण्याची धमकी देणे इतपर्यंत मजल गेली आहे. आता सावदा येथील डॉ. सुनील चौधरी यांच्या गजानन हॉस्पिटलमध्ये तोडफोड आणि दगडफेक करण्यात आली.

यामुळे सदर खंडणीचा गुन्हाबाबत जलद गतीने तपास करून, योग्य ती यंत्रणा राबवून गुन्ह्रेगारांना ८ दिवसात अटक करावी. सदर खटला जलद गतीने न्यायालयात चालवून संशयितांना कठोरपणे शिक्षा देण्यात यावी. डॉ.कोळंबे ,डॉ. चौधरी आणि परिवाराला शासकीय खर्चाने संरक्षण देण्यात यावे. अशी मागणीही यावेळी करण्यात आली.