BJP MLA Sanjay Saavkare hints at returning home, photos of Mahajan and BJP leaders disappear in advertisements

भुसावळचे आमदार संजय सावकारे हे खडसेंचे खानदेशातील समर्थक म्हणून ओळखले जातात. संजय सावकारे आणि त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी आणि जाहिरातींद्वारे आपण कोणासोबत आहोत हे दाखवून दिले आहे. आमदार संजय सावकारे यांचा वाढदिवसाचे पोश्टर आणि जाहीराती करण्यात आल्या. या जाहीरातींमध्ये भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब आहेत.

जळगाव : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. यांनंतर येणाऱ्या काळात मोठ्या उलथापालथी होणार अशा चर्चांणा उधाण आले होते. एकनाथ खडसे यांच्यासोबत अनेक समर्थकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तसेच काही समर्थकांना पक्षांतराच्या अडचणी येऊ नये म्हणून टर्म झाल्यानंतर खडसेंच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

भुसावळचे आमदार संजय सावकारे (BJP MLA Sanjay Saavkare) हे खडसेंचे खानदेशातील समर्थक म्हणून ओळखले जातात. संजय सावकारे आणि त्यांच्या समर्थकांनी बॅनरबाजी आणि जाहिरातींद्वारे आपण कोणासोबत आहोत हे दाखवून दिले आहे. आमदार संजय सावकारे यांचा वाढदिवसाचे पोश्टर आणि जाहीराती करण्यात आल्या. या जाहीरातींमध्ये भाजपच्या नेत्यांचे फोटो गायब  (BJP leaders disappear in advertisements) आहेत.

आज भुसावळचे आमदार संजय सावकारे यांचा वाढदिवस आहे. त्यांच्या समर्थकांनी जाहीरातींमध्ये भाजपच्या नेत्यांचे फोटोंएवजी एकनाथ खडसे आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश गाडे यांची छायाचित्रे लावली आहेत. तसेच काही ठिकाणी रक्षा खडसे यांचे छायाचित्र आहे. माजी पालकमंत्री गिरिश महाजन आणि भाजपच्या बड्या नेत्यांची छायाचित्रे मात्र जाहिरातींवरुन गायब झाल्याचे दिसते आहे. यावरुन भाजप कार्यकर्ते आणि भाजप नगरसेवक हे खडसेंचे समर्थक असल्याचे दिसून येते.

भुसावळ विधानसभा हे एकेकाळी राष्ट्रवादीकडे होता. त्यानंतर आमदार संजय सावकारे यांनी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपात प्रवेश केला आणि आमदारकी आपल्या पदरात पाडून घेतली. परंतु एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यावर त्यांचे समर्थक संजय सावकारे एकनाथ खडसेंना समर्थन देणार असल्याचे दिसते आहे. त्यामुळे जर संजय सावकारेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास पुन्हा खान्देश राष्ट्रवादीमय होणार यामध्ये शंका नाही.