खडसे-फडणवीस भेटीतून भाजपाकडून डॅमेज कंट्राेलचा प्रयत्न

साेमवारी विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नाथाभाऊंच्या घरी फडणवीस पाेहाेेचल्याने वेगळ्या राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. खान्देशातील राजकीय खेळींमुळे शिवसेनेचे पारडे जड हाेत असल्याचे चित्र निर्माण हाेत आहे, हेच फडणवीस यांनी शरद पवारांच्या निदर्शनास आणून दिल्याची देखील चर्चा आहे. आता खडसे यांच्या भेटीत नेमकी काय ‘सेटिंग’ झाली, हे येणारा काळच ठरवणार आहे.

    जळगाव : गेल्या काही दिवसांपासून खान्देशात भाजपाला ठिकठिकाणी माेठे खिंडार पडत आहेत. जळगाव महापािलकेतील सत्ता गेल्यानंतर अाता नगरपािलका तसेच ग्रामपंचायतीमध्ये सत्तांतर हाेऊ लागले आहे. यातून हाेणारे डॅमेज ‘कंट्राेल’ करण्यासाठीच िवराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी खडसेंच्या घरी भेट दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

    पदाधिकाऱ्यांना संदेश
    खान्देशातील वजनदार नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर भाजपाला एकामागे एक धक्के द्यायला सुरूवात केली. आधी जळगाव महापािलकेत आपल्या समर्थकांना शिवसेनेत पाठवून भाजपाची सत्ता हिरावून घेतली. आता मुक्ताईनगर येथील सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने येथील सत्ताही भाजपाला साेडावी लागणार आहे. त्यामुळेच खासदार राेहिणी खडसे यांची सदिच्छा भेट घेण्याच्या नावाखाली फडणवीस आणि गिरीश महाजन हे खडसेंच्या घरी पाेहाेचले. यातून खडसेंशी अजूनही जवळीक असल्याचा संदेश कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना देण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

    दाेन दिग्गज नेत्यांच्या भेटी
    दरम्यान, साेमवारी विराेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी नाथाभाऊंच्या घरी फडणवीस पाेहाेेचल्याने वेगळ्या राजकीय चर्चांनाही उधाण आले आहे. खान्देशातील राजकीय खेळींमुळे शिवसेनेचे पारडे जड हाेत असल्याचे चित्र निर्माण हाेत आहे, हेच फडणवीस यांनी शरद पवारांच्या निदर्शनास आणून दिल्याची देखील चर्चा आहे. आता खडसे यांच्या भेटीत नेमकी काय ‘सेटिंग’ झाली, हे येणारा काळच ठरवणार आहे.