नितीशकुमारांना संपवण्याचा भाजपचा डाव!, शिवसेना नेत्याचा मोठा खुलासा…

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra  vidhan sabha Election) भाजपने शिवसेनेसोबत (Shiv Sena) युतीचे नाटक करून बंडखोरीला प्रोत्साहन दिले व गद्दारी करीत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. आता तसाच प्रयत्न भाजप बिहारमध्ये (Bihar)  नितीशकुमारांना (Nitish Kumar) संपवण्यासाठी करत आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम्ही भाजपच्या गद्दारीचा मुद्दा मतदारांसमोर मांडणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शुक्रवारी जळगावात दिली.

 जळगाव : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत (Maharashtra  vidhan sabha Election) भाजपने शिवसेनेसोबत (Shiv Sena) युतीचे नाटक करून बंडखोरीला प्रोत्साहन दिले व गद्दारी करीत शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. आता तसाच प्रयत्न भाजप बिहारमध्ये (Bihar)  नितीशकुमारांना (Nitish Kumar) संपवण्यासाठी करत आहे. त्यामुळे बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आम्ही भाजपच्या गद्दारीचा मुद्दा मतदारांसमोर मांडणार असल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते, कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी शुक्रवारी जळगावात दिली. शहरातील अजिंठा विश्रामगृहात गुलाबराव पाटील पत्रकारांशी बोलत होते. बिहार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पक्षाने माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला ‘स्टार प्रचारक’ म्हणून संधी दिली आहे. हा जळगाव आणि खान्देशाचा सन्मान आहे, असे पाटील म्हणाले.

भाजपने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीवेळी बंडखोरीच्या माध्यमातून शिवसेनेसोबत जो दगाफटका केला, तोच कित्ता आता ते बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबत गिरवत आहेत. बिहारमध्ये लोक जनशक्ती पार्टी कोणी दुसरे नाही तर भाजप फोडत आहे. भाजपने ज्याप्रमाणे महाराष्ट्रात युती असूनही आमच्या विरोधात अधिकृत बंडखोर उमेदवार उभे केले होते, त्याचप्रमाणे आता भाजपकडून तिकीट नाकारलेले लोक जनशक्ती पार्टीमध्ये जात आहेत.

गुलाबराव पाटील, कॅबिनेट मंत्री

 

लोजप उमेदवाराला छुपे बळ

बिहारमधील ज्या मतदारसंघात नितीशकुमारांचा उमेदवार आहे, त्याचठिकाणी लोक जनशक्ती पार्टीच्या उमेदवाराला भाजपकडून बळ दिले जात आहे. ज्याप्रकारे महाराष्ट्रात बंडखोरीतून शिवसेनेची कोंडी करत संपवण्याचा प्रयत्न केला. तशाच प्रकारे नितीश कुमारांच्या उमेदवाराला पाडण्याचा प्रयत्न होणार आहे. आधी शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न झाला, नंतर पंजाबमध्ये बादलांना संपवण्याचा प्रयत्न केला. आता बिहारमध्ये नितीश कुमारांना संपविण्याचा भाजपचा उद्देश आहे. हाच मुद्दा आम्ही प्रचारात मांडून भाजपचा खरा चेहरा उघड करू, असे गुलाबराव पाटील म्हणाले. शिवसेनेवर भाजपकडून हिंदुत्त्व आणि मराठी अस्मितेच्या मुद्यावरून होणाऱ्या टीकेबाबत मत मांडताना त्यांनी सांगितले की, आम्ही बिहारमध्ये हिंदीतून प्रचार करू म्हणून विरोधक टीका करत आहेत. पण हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे. आम्ही हिंदुस्थानात असतो तेव्हा हिंदुस्थानी असतो आणि महाराष्ट्रात असतो तेव्हा मराठी असतो. शिवसेनाप्रमुखांनी देखील आम्हाला हेच सांगितले असल्याचे पाटील म्हणाले.

खडसे कुठेही गेले तरी आम्हाला आनंदच

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा सुरू आहे. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, एकनाथ खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. लीडर म्हणून त्यांची पत आहेच. ३० वर्षे आमदार राहिले आहेत. त्यांनी मंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. ते शिवसेनेत आले, राष्ट्रवादी गेले किंवा काँग्रेसमध्ये गेले तरी आम्हाला आनंद आहे. खडसे भाजपतून गेले, हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा असल्याचेही सांगण्यास गुलाबराव विसरले नाहीत.