काँग्रेसच्या ४७ कार्यकर्त्यांचे रक्तदान; रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी काँग्रेस पक्षाचे आवाहन

कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्ताची पूर्तता व्हावी या उद्देशाने शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.

    जळगाव (Jalgaon).  कोरोनाच्या काळात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. गरजू रुग्णांना रक्ताची आवश्यकता असल्याने रक्ताची पूर्तता व्हावी या उद्देशाने शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. येथे काँग्रेसकडून आयोजित शिबिरामध्ये 47 कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी युवकांनी स्वयंस्फुर्तीने पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन काँग्रेस नेत्या डॉ. स्वाती वाकेकर यांनी केले.

    शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने म. ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिर प्रसंगी त्या बोलत होत्या. जि.प. चे माजी अध्यक्ष प्रकाश अवचार उपस्थित होते. सुरुवातीला म. फुले आणि डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. रक्तदान शिबिराला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. जिल्हा काँग्रेसच्या आवाहनाला प्रतिसाद देत ठिकठिकाणी रक्तदान शिबिरातून रक्त संकलन केले जात आहे.