brother and sister have tried to commit suicide by drinking poison the sister died and brother is undergoing treatment

अभ्यासातून आलेल्या नैराश्यातून भावाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्याचा प्रयत्न केला. तर या तरुणाच्या लहान बहिणीनेदेखील विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना दि. १६ रोजी भोलाणे येथे घडली. भाऊबीजेलाच बहिण भावांच्या या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

जळगाव : अभ्यासातून आलेल्या नैराश्यातून भावाने विषारी द्रव प्राशन करुन आत्महत्याचा प्रयत्न केला. तर या तरुणाच्या लहान बहिणीनेदेखील विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना दि. १६ रोजी भोलाणे येथे घडली. भाऊबीजेलाच बहिण भावांच्या या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. विष प्राशन करणाऱ्या भावाचे नाव विश्वजीत विजय कोळी (वय २१) आहे. तर मृत बहिणीचे नाव अश्विता विजय कोळी (वय १९) असे आहे. विश्वजीत वर जळगाव येथील खासगी रुग्णालायात उपचार सुरु आहेत. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

अभ्यासात मन लागत नाही म्हणून विश्वजीत निराश झाला होता. तसेच आई वडिलांसोबत त्याचा याच कारणावरुन वाद झाला. नैराश्यातून आणि आई वडिलांशी झालेल्या वादातून त्याने सोमवारी (दि. १६) शेतात फवारणीसाठी वापरले जाणारे औषध प्राशन केले. त्याच दरम्यान दहा मिनिटांच्या अंतरानंतर त्याची लहान बहीण अश्विता हिने देखील घराच्या बाहेर जाऊन विष प्राशन केले. कुटुंबियांच्या हे दोन्ही प्रकार लक्षात आल्यावर दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. परंतु, रुग्णालायात दाखल करीत असताना वाटेतच अश्विता हिचा मृत्यू झाला. तर विश्वजीत याला शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याच्यावर अद्याप उपचार सुरु आहेत.