चाळीसगावच्या वाकडी गावातील अमित पाटील यांना वीरमरण, तालुक्याने दुसरा जवान गमावला

चाळीसगावचे जवान अमित साहेबराव पाटील (Amit Sahebrao Patil)  हे बीएसएफमध्ये (BSF) जम्मू-काश्मीर (jammu-kashmir ) येथे कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांच्या अंगावर बर्फाची लादी पडून त्यांचा अपघात झाला होता. परंतु आज सकाळी दहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

चाळीसगाव : चाळीसगावचे जवान अमित साहेबराव पाटील (Amit Sahebrao Patil)  हे बीएसएफमध्ये (BSF) जम्मू-काश्मीर (jammu-kashmir ) येथे कार्यरत होते. कर्तव्य बजावत असताना त्यांच्या अंगावर बर्फाची लादी पडून त्यांचा अपघात झाला होता. परंतु आज सकाळी दहा वाजता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या महिनाभरात चाळीसगाव (Chalisgaon ) तालुक्यातील दोन जवानांच्या मृत्यूने पुन्हा शोककळा पसरली आहे.

वाकडी येथील रहिवासी साहेबराव नथु पाटील यांचे मोठे चिरंजीव अमित साहेबराव पाटील हे २०१० मध्ये बीएसएफ मध्ये कार्यरत झाले होते. जम्मू-काश्मीर येथे कर्तव्य बजावत असताना आठ दिवसांपर्वी त्यांच्या अंगावर बर्फाची लादी कोसळली होती. यावेळी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शहीद जवान अमित पाटील यांचे कुटुंब शेतकरी असून त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि लहान भाऊ असा परिवार आहे.