आमदार मंगेश चव्हाण यांनी वीज वितरणच्या अधिकार्‍यांना खुर्चीला बांधले

आमदार मंगेश चव्हाण यांनी चक्क अधिकार्‍यांनाच खुर्चीला बांधले. यानंतर त्यांना चपलांचा हार घालण्याची तयारी देखील करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली असून वीज वितरण कंपनीच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्मित झाले आहे.

    जळगाव : वीज वितरण कंपनीचे अधिकारी अनेकदा तक्रारी करूनही शेतकर्‍यांच्या समस्यांचे निराकरण करत नसल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार मंगेश चव्हाण यांनी अधिकार्‍याला चक्क खुर्चीला बांधल्याने खळबळ उडाली आहे.

    चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांनी शेतकर्‍यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण व्हावे म्हणून आज वीज वितरणच्या मुख्य कार्यालयात धडक दिली आहे. याप्रसंगी त्यांनी रूद्रावतार धारण करत अधिकार्‍यांची खरडपट्टी काढली. याप्रसंगी त्यांच्या सोबत अनेक शेतकर्‍यांनी आपल्या समस्या मांडल्या. मात्र अधिकार्‍यांनी आपण कार्यवाही करत असल्याचे उत्तर दिले.तालुक्यातून साज हजार वीज कनेक्शन तोडण्यात आल्याबद्दलही त्यांनी जाब विचारला.

    यामुळे संतप्त झालेले आमदार मंगेश चव्हाण यांनी चक्क अधिकार्‍यांनाच खुर्चीला बांधले. यानंतर त्यांना चपलांचा हार घालण्याची तयारी देखील करण्यात आली. यामुळे खळबळ उडाली असून वीज वितरण कंपनीच्या आवारात गोंधळाचे वातावरण निर्मित झाले आहे.

    वीज वितरणच्या मुख्यालयास आमदार मंगेश चव्हाण यांनी लावले कुलूप !
    चाळीसगाव तालुक्यातील सात हजार लोकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले असून शेतकर्‍यांच्या विजेच्या समस्यांचे निराकरण करण्यात आले नाही. यामुळे संतप्त झालेले आमदार मंगेश चव्हाण यांनी आज रूद्रावतार धारण करत वीज वितरण कंपनीच्या मुख्य कार्यालयात धडक दिली. त्यांनी अधिकार्‍याला खुर्चीला बांधून बाहेर आणले. तर पोलीस उपस्थित झाले असता ते स्वत:हून गाडीत बसले. तर नंतर त्यांनी कार्यालयास कुलूप बांधले.