जळगाव जिल्ह्यात विवाह समारंभात झाली कोरोनाची लागण,  माजी नगरसेविका आणि त्यांच्या पतीचे निधन

  • जळगाव शहरामधील अयोध्या नगर परिसरात रहिवासी असलेल्या माजी नगरेविका संगीता राणे यांना परिवारातील विवाहा समारंभादरम्यान कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पतीलाही कोरोनाने गाठले. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर उपचारादरम्यान त्यांचा दोघांचा मृत्यू झाला.

जळगाव – जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग झपाट्याने होत आहे. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. जळगावमध्ये कोरोनाबाधितांचा आकडा साडेपाच हजाराच्या घरात पोहोचला आहे. तसेच कोरोनामुळे ३०९ लोकांचा मृत्यू झाला आहे. विवाहा समारंभात कोरोनाची लागण झाल्याने माजी नगरसेविका आणि त्यांच्या पतीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 

जळगाव शहरामधील अयोध्या नगर परिसरात रहिवासी असलेल्या माजी नगरेविका संगीता राणे यांना परिवारातील विवाहा समारंभादरम्यान कोरोनाची लागण झाली. त्यांच्या पतीलाही कोरोनाने गाठले. त्यांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्याने रुग्णालयात दाखल केले होते. यानंतर उपचारादरम्यान त्यांचा दोघांचा मृत्यू झाला. 

संगीता राणे यांच्या परिवारात दहा दिवस आधी एक विहाह सोहळा पार पडला यात मुंबई, पुण्यातील नातेवाईक सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट होत आहे. संगीता राणे आणि त्यांच्या पतीला कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. परंतु उपचारादरम्यान प्रकृती ढासळत चालली होती. त्यांच्या पतीचे नीधन झाल्याच्या एक दिवस नंतर माजी नगरसेविका संगिता राणे यांचा मृत्यू झाला.