जळगाव जिल्ह्याचा रिकव्हरी दर ९६ टक्क्यांवर; नवीन ७७ रुग्ण आढळले

    जळगाव (Jalgaon). जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर (corona recovery rate) आता ९६.७७ टक्क्यांवर पोहोचल्याचा दिलासा मिळाला असतानाच आजची नवी रुग्णसंख्या ७७ नोंदवली गेली . त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा (the health system) ताण आता बऱ्यापैकी कमी होताना दिसतो आहे. जिल्हा कोवीड रूग्णालयाने (the District Covid Hospital) पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ७७ बाधित रूग्ण (infected patients) आढळले आहे. तर १८७ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आजच एका बाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याचे दिसून येत आहे.

    तालुकानिहाय आजची आकडेवारी
    जळगाव शहर-१२ , जळगाव ग्रामीण-४, भुसावळ-५, अमळनेर-३, चोपडा-६, पाचोरा-४, भडगाव-०, धरणगाव-२, यावल-४, एरंडोल-२, जामनेर-५, रावेर-५, पारोळा-३, चाळीसगाव-१८, मुक्ताईनगर-४, बोदवड-० आणि इतर जिल्ह्यातील ० असे एकुण ७७ बाधित रूग्ण आढळले आहे.

    आजच्या अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत एकुण १ लाख ४१ हजार ४४६ बाधित रूग्ण आढळून आले आहे. त्यापैकी १ लाख ३६ हजार ८७१ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. तर २ हजार १४ बाधित रूग्ण विविध कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे. आज दिवसभरात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांनी दिली आहे.

    जिल्ह्याचा कोरोना रिकव्हरी दर (corona recovery rate) आता ९६.७७ टक्क्यांवर पोहोचल्याचा दिलासा मिळाला असतानाच आजची नवी रुग्णसंख्या ७७ नोंदवली गेली . त्यामुळे आरोग्य यंत्रणेवरचा (the health system) ताण आता बऱ्यापैकी कमी होताना दिसतो आहे. जिल्हा कोवीड रूग्णालयाने (the District Covid Hospital) पाठविलेल्या कोरोना अहवालात आज दिवसभरात ७७ बाधित रूग्ण (infected patients) आढळले आहे.