jamner flood

काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जामनेर(Jamner) तालुक्यामध्ये चक्रीवादळ आणि पावसाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असणाऱ्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तरी शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

    जामनेर: जामनेर(Jamner) तालुक्यामध्ये काल झालेल्या चक्रीवादळ (Cyclone And Rain In Jamner)आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे गिरीश महाजन(Girish Mahajan Demand for Help From Government) यांनी त्वरित भरपाईची मागणी केली आहे. काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास जामनेर तालुक्यामध्ये चक्रीवादळ आणि पावसाच्या तडाख्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतात उभ्या असणाऱ्या पिकांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घरांचीही मोठ्या प्रमाणात पडझड झाली. तरी शासनाने त्वरित मदत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

    काल झालेल्या चक्रीवादळ आणि पावसामुळे जामनेर तालुक्यातील मका,कपाशी आणि केळी ही पिके हातातोंडाशी आली असताना भुईसपाट झाली आहेत. त्यामुळे शेतकरी राजाचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दीड वर्षापासून सरकारने शेतकऱ्यांना एकही रुपयाची मदत दिली नाही. आता तरी सरकारने जागे होऊन या शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यायला हवी आहे. सरकार फक्त पंचनामे करत आहे. मदत केव्हा देणार अशी प्रतिक्रिया नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करताना माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे.