दैनिक ‘नवराष्ट्र’ इम्पॅक्ट : लासलगांवच्या सोळा गाव पाणी पुरवठा योजनेची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकाऱ्याकडून पाहणी

लासलगाव : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सोळागाव पाणीपुरवठा योजना जीर्ण झाल्याने अनेक वर्षांपासून लासलगावला नेहमी पाणी असून देखाली पाणी टंचाईला सामोरे जावे लागत होते. याबाबत दैनिक ‘नवराष्ट्र’ने अनेकदा वृत्त प्रकाशित केले होते. आज याबाबत महाराष्ट्र जीवन प्राधीकारण खात्याचे अधिकारी नांदुरमध्ये येऊन जॅकवेल येथे प्रत्यक्ष नवीन पाईपलाईन करणेकामी पाहणी केली. यावेळी १६ गाव समिती अध्यक्ष जयदत्त होळकर, सचिव शरद पाटील यांनी या योजनेत येत असलेल्या अडचणी मांडल्या. या विषयावर उद्या (१३)रोजी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुंबई येथे बैठक बोलाविली असल्याची माहिती जयदत्त होळकर यांनी दिली

यापूर्वी २४ सप्टेंबर रोजी नाशिक येथे झालेल्या बैठकीत १६ गाव पाणी पुरवठा योजनेचा नवा आराखडा लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी पाणीपुरवठा मंत्री आणि वित्तमंत्री यांच्यासोबत चर्चा करून मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे बैठकीत ना भुजबळ बोलले होते. आज ( १२) रोजी महाराष्ष्ट्र जीवन प्राधीकारण खात्याचे अधिकारी प्रत्यक्ष नांदुरमध्यमेवर येथे पाहणी करण्यासाठी आले होते. या योजनेत येत असलेल्या अडचणी जयदत्त होळकर यांनी या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या.

सोळागाव योजनेची पाईपलाईन १५ ते २० वर्ष जुनी असलेली पाईपलाईन खराब झाल्याने अनेकदा लिकेजचे प्रश्न निर्माण होत असतात. याबाबत जयदत्त होळकर यांनी पालकमंत्री भुजबळ यांच्याकडे पाठपुरावठा केला होता.पालकमंत्री भुजबळ यांनी विधानसभेच्या सभागृहात विषय मांडत सदर योजनेसाठी नवीन पाईपलाईन लाईन टाकणे व विजबिल खर्च कमी करण्यासाठी सौर प्रकल्प बसविण्यास मंजुरी मिळाली होती. एकूण १५ कोटींचा आराखडा मंत्रालयस्तरावर असून १३ रोजी मुंबई येथे बैठक होणार आहे.