जळगाव जिल्ह्यात आजही ११९४ कोरोना बाधित; चोपड्यात ‘हॉटस्पॉट’ कायम

कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ८५ हजार ४८३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७२ हजार ७४२ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ११ हजार १५५ रूग्ण विविध कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-३, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-४, धरणगाव-२, यावल-२ आणि रावेर १ अशा १४ जणांचा मृत्यू झाला आहे.

    जळगाव : जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले असले तरी गेल्या चोवीस तासांमध्ये ११९४ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यात चोपडा तालुका हा हॉटस्पॉट बनला असून येथे सर्वाधिक तब्बल २९३ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

    प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात आज जिल्ह्यात ११९४ कोरोना बाधित आढळून आले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून सर्वाधुक रूग्ण हे जळगाव शहर व चोपडा तालुक्यातील आहेत. आज चोपडा तालुक्यात पुन्हा संसर्ग पहिल्या क्रमांकावर पोहचला आहे. या तालुक्यात तब्बल २९३ रूग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. तर जळगाव शहरात २८४ कोरोना बाधित आढळून आले आहेत.

    आज जिल्ह्यात जळगाव शहर-२८४, जळगाव ग्रामीण-२०, भुसावळ-१०६, अमळनेर-२७, चोपडा-२९३, पाचोरा-३३, भडगाव-११०, धरणगाव-६४, यावल-४७, एरंडोल-२५, जामनेर-२५, रावेर-१०, पारोळा-३१, चाळीसगाव-७४, मुक्ताईनगर-११, बोदवड-१५ आणि इतर जिल्ह्यातील १९ असे एकूण १ हजार १९४ रूग्ण आढळून आले आहे.

    कोरोना अहवालानुसार जिल्ह्यात आजपर्यंत ८५ हजार ४८३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ७२ हजार ७४२ रुग्ण बरे होवून घरी परतले आहेत. तर ११ हजार १५५ रूग्ण विविध कोविड रूग्णालयात उपचार घेत आहे. जळगाव शहर-३, भुसावळ-१, अमळनेर-१, चोपडा-४, धरणगाव-२, यावल-२ आणि रावेर १ अशा १४ जणांचा मृत्यू झाला आहे. यात अमळनेर तालुक्यातील २ वर्षीय बालकाचा समावेश आहे. अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अधिकारी डॉ. एन.एस.चव्हाण यांनी कळविले आहे.

    जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन आणि होळी तसेच धुलिवंदनाच्या कालावधीत संसर्गात वाढ होण्याची शक्यता असल्याने आजपासून तीन दिवसांचा जनता कर्फ्यू लावण्यात आलेला आहे. यामुळे कोरोनाची साखळी तुटण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.