प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील यावल शहरात बुधवारी भरदिवसा चार बंदुकधारी अज्ञात दरोडेखोरोंनी सराफाचे दुकान लुटले (unidentified robbers robbed a bullion shop in Yaval) आणि लाखाेंचा ऐवज लांबवला. दरोडेखोरांना रोखताना दोन बंदुका रस्त्यात फेकून दिल्या. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली.

    जळगाव (Jalgaon) :  जिल्ह्यातील यावल शहरात बुधवारी भरदिवसा चार बंदुकधारी अज्ञात दरोडेखोरोंनी सराफाचे दुकान लुटले (unidentified robbers robbed a bullion shop in Yaval) आणि लाखाेंचा ऐवज लांबवला. दरोडेखोरांना रोखताना दोन बंदुका रस्त्यात फेकून दिल्या. यामुळे शहरात एकच खळबळ उडाली. (robbery at a bullion shop in Yaval city) नगरपालिका रोडवरच्या एका सराफ दुकानावर चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्या चांदीचे दागिने यांसह रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना आज दुपारी घडली.

    जगदीश कवडीवाले ( रा- यावल ) यांचे मुख्य बाजारपेठेत बाजीराव काशिनाथ कवडीवाले या नावाचे सराफ दुकान आहे. आज नेहमी प्रमाणे सकाळी दहा वाजता त्यांनी दुकान उघडून व्यवहार सुरू केले. दरम्यान दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास एका पल्सर गाडीवर ३ अज्ञात दरोडेखोरांनी येऊन दागिने बनवायचे सांगितल्याचा बहाणा केला. त्याच्यापाठोपाठ चौथाही आला.

    त्यानंतर चौघांपैकी एकाने दुकानदार जगदीश कवडी वाले यांच्या छातीवर बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या दुकानातील सोन्याचे दागिने  काही रोकड असा ऐवज लंपास केल्याची घटना घडली. दिवसा ढवळ्या घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नागरिकांनी सांगितले की, या दरोडेखोरांपैकी एकाने हवेत फायरिंग देखील केली होती. घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून चौकशीचे काम सुरू आहे. नेमका किती माल आणि रोकड दरोडेखोरांनी लुटून नेली हे लगेच समजू शकले नाही.