Devendra Fadnavis - Corona Wiresmule Administration

  • दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारा आणि उपाययोजनांबद्दल आढावा घेतला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी कोरोना संसर्ग आणि सुविधांबाबत आढावा बैठक घेतली. यात त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही सुविधा आणि उपाययोजना सांगितल्या आणि टेस्टींग वाढवण्याबाबत संगितले.

जळगाव – राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे पक्षनेते प्रवीण दरेकर हे जळगाव दौऱ्यावर होते. त्यांनी जळगाव जिल्ह्यातील शासकीय कोविड रुग्णालयाला भेट दिली तसेच वैद्यकीय महाविद्यालयाची पाहणी केली. त्यांच्यासोबत आमदार गिरीश महाजन आणि जिल्ह्यातील भाजप आमदार उपस्थित होते. 

दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी कोरोना रुग्णांच्या उपचारा आणि उपाययोजनांबद्दल आढावा घेतला. जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी कोरोना संसर्ग आणि सुविधांबाबत आढावा बैठक घेतली. यात त्यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी काही सुविधा आणि उपाययोजना सांगितल्या आणि टेस्टींग वाढवण्याबाबत संगितले. 

दरम्यान जळगावमध्ये आणखी उपाययोजनांची गरज असल्याचे सांगितले. देवेंद्र फडणीस म्हणाले की जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा भयावह आहे. कोरोना नमुने कमी प्रमाणात टेस्टींग होत आहे. त्यामुळे अहवाल येण्यात ३ ते ४ दिवस उशीर होत आहे. तो २४ तासात येणे आवश्यक आहे. अहवाल उशीरा आल्याने रुग्ण दगावत आहेत. रुग्णवाहिकांचा आभाव आहे. रुग्णवाहिका वाढविण्याची मागणी केली आहे. तसेच टेस्टींग वाढवण्याबाबतही सुचना केल्या आहेत.