कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; निलकमल रुग्णालयात तोडफोड

जळगाव : काेराेनाबािधत महिलेच्या मृत्यूनंतर येथील नीलकमल रुग्णालयात मृत महिलेच्या नातेवाईकांनी ताेडफाेड केल्याची घटना घडली आहे. संबंधित डाॅक्टरवर तात्काळ गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे.येथील नीलकमल या खाजगी रुग्णालयात संगीता पांडूरंग पाटील (५०) रा. जिल्हा बँक कॉलनी या काेराेेानवर उपचार घेत हाेत्या. उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालावल्यानंतर वेळेवर व्हेंटिलेटरचा उपयाेग न केल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा अाराेप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

संगीता पाटील यांना काेविड निमोनिया झाल्याने २९ सप्टेंबर रोजी नीलकमल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. १० ऑक्टोबर रोजी कोरानाचे स्वॅब घेतले होते. या रिपाेर्ट येणे बाकी हाेते. मात्र त्याआधीच संगीता पाटील यांची प्रकृती खालावल्याने त्यांचा मुलगा महेंद्र पाटील यांना कळविण्यात आले. महेंद्र पाटील हे रुग्णालयात पोहचताच त्यांच्या आईचे उपचारादरम्यान निधन झाल्याचे सांगण्यात आले . तोपर्यंत मयत महिलेचे नातेवाईकही रुग्णालयात दाखल झाले. त्यांना संगीता यांच्यावर व्हेंटीलेटरवर उपचार सुरू ठेवावे, अशी मागणी केली होती. मात्र डॉक्टरांनी फक्त अाॅिक्सजन लावून उपचार सुरू ठेवले. अखेर अाज दुपारी १२ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रूग्णाला व्हेंटीलेटरची आवश्यकता असतांना फक्त अाॅिक्सजनवर उपचार सुरू ठेवल्याचा आरोप संतप्त नातेवाईकांनी केला. या ठिकाणी बराच वेळ गोंधळ सुरू असतांना नातेवाईकांनी नीलकमल रुग्णालयातील सामनाची तोडफोड सुरू केली. रुग्णालयात दाखल असलेल्या इतर रूग्णांना अाॅिक्सजन पुरवठा करणारे सिलिंडर काढून फेकले. तर कॅबिनमधील सामानांची तोडफोड करून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या तोडफोडमध्ये एका तरूणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे.

मृतदेह घेण्यास नकार
यापूर्वी महिलेवर उपचारासाठी नातेवाईकांनी ३५ हजार रूपये भरले होते, तर आज ५० हजार रूपये भरूनही महिलेवर वेळेवर उपचार केले नाहीत. संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय आईचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा मयत महिलेचा मुलगा महेंद्र पाटील यांच्यासह नातेवाईकांनी घेतला आहे. हा प्रकार होताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक विनायक लोकरे यांनी भेट देवून गोंधळ शांत केला.