भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेने महापालिकेची सत्‍ता  काबीज करत भगवा फडकाविला! ; आदित्य ठाकरे यांनी केले अभिनंदन

जळगाव महापालिकेच्या महापौर निवडीच्‍या अनुषंगाने गेल्‍या चार दिवसांपासून राजकिय उलथापालथ घडत आहेत. शिवसेनेची पुरेशी सदस्‍य संख्या नसताना देखील भाजपचे फुटलेले ३१ आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांच्या मदतीने जळगाव महापालिकेवर भगवा फडकविला. यात महापौर पदी जयश्री महाजन यांची तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली.

    जळगाव : महापालिकेत अनेक वर्षानंतर भाजपने सत्‍तांतर घडविल्‍यानंतर ते टिकविता आले नाही. एकहाती सत्‍ता मिळविणाऱ्या भाजपचेच नगरसेवक फुटल्‍यानंतर अवघ्‍या अडीच वर्षानंतर पुन्हा सत्‍तांतर घडले. भाजपला धोबीपछाड देत शिवसेनेने महापालिकेची सत्‍ता काबीज करत भगवा फडकाविला.

    जळगाव महापालिकेच्या महापौर निवडीच्‍या अनुषंगाने गेल्‍या चार दिवसांपासून राजकिय उलथापालथ घडत आहेत. शिवसेनेची पुरेशी सदस्‍य संख्या नसताना देखील भाजपचे फुटलेले ३१ आणि एमआयएमच्या तीन नगरसेवकांच्या मदतीने जळगाव महापालिकेवर भगवा फडकविला. यात महापौरपदी जयश्री महाजन यांची तर उपमहापौरपदी कुलभूषण पाटील यांची निवड झाली.

    आदित्य ठाकरे यांनी केले अभिनंदन
    जळगाव महानगरपालिकेच्या महापौरपदी निवड झालेल्या शिवसेनेच्या जयश्री महाजन तसेच उपमहापौरपदी निवड झालेले कुलभूषण पाटील यांचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केले असून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही ट्विटरच्यामाध्यमातून दिल्या.