जेवल्याशिवाय जाऊ नका, खडसेंचा आग्रह, फडणवीस काय म्हणाले? : वाचा सविस्तर

देवेंद्र फडणवीसांचा जळगाव दौरा आणि आपली पवार भेट हा निव्वल योगायोग होता. तसेच मी देवेंद्र फडणवीसांना जेवण करुन जा, अशी विनंती केल्याचंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर असताना फडणवीस चहापानासाठी खडसेंच्या नितळीतील घरी गेले. त्यावेळी एकनाथ खडसे घरी उपस्थित नव्हते. मात्र भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी फडणवीस आणि खडसेंचं बोलणं करुन दिलं होतं.

    जळगाव : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी जळगाव दौऱ्यावर असताना एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या घरी भेट दिली. तर दुसऱ्याच दिवशी एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुंबईतील सिल्व्हर ओकवर भेट घेतली. या भेटीगाठींमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. याबाबत एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली असता, फडणवीसांचा जळगाव दौरा आणि आपली पवार भेट हा निव्वल योगायोग असल्याचं म्हटलंय. त्याचबरोबर आपण फडणवीसांना जेवण करुन जा, अशी विनंती केल्याचंही त्यांनी सांगितलं.

    दरम्यान देवेंद्र फडणवीसांचा जळगाव दौरा आणि आपली पवार भेट हा निव्वल योगायोग होता. तसेच मी देवेंद्र फडणवीसांना जेवण करुन जा, अशी विनंती केल्याचंही एकनाथ खडसे यांनी सांगितलं आहे. मुक्ताईनगरच्या दौऱ्यावर असताना फडणवीस चहापानासाठी खडसेंच्या नितळीतील घरी गेले. त्यावेळी एकनाथ खडसे घरी उपस्थित नव्हते. मात्र भुसावळचे आमदार संजय सावकारे यांनी फडणवीस आणि खडसेंचं बोलणं करुन दिलं होतं.

    खडसे काय म्हणाले ?

    मी मुंबईत आहे. आमच्या घरी आपलं स्वागत आहे. पण मी नसलो तरी जेवल्याशिवाय जाऊ नका, असा आग्रह फडणवीसांना केला. त्यावेळी फडणवीसांनी नुकसानाची पाहणी करण्यासाठी आपल्या भागात आलोय. माझे पुढचे कार्यक्रम नियोजित आहेत. मात्र, पुढच्यावेळी आलो की नक्की जेवण करेन असं म्हणाल्याचं खडसेंनी सांगितलं. दरम्यान, फडणवीस नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी मुक्ताईनगरला माझ्या घरी येणे आणि मी पवारांना भेटण्यासाठी जाणं हा योगायोग होता. पवार साहेबांची भेट ही नियोजित होती, असं खडसेंनी स्पष्ट केलं आहे.