डॉ भारती पवार यांच्या नावामुळे डॉ हीना गावित यांची संधी गेली

भारती पवार व कपिल पाटील हे दोघेही राष्राटीवादी काँग्रेसमधून भाजपात आले आहेत. पवार या तर मागच्या 2019 च्या निवडणुकीतच भाजपात आल्या व थेट खासदार झाल्या आणि आता दोन वर्षांच्या आतच त्यांना मंत्रीपदाची संधी मिळते आहे.

    जळगाव : केंद्रीय मंत्री मंडळ विस्तारात डॉ भारती पवार यांना स्थान मिळाले आहे. पवार यांच्या नावामुळे डॉ हीना गावित यांची संधी गेली आहे. जळगाव खानदेशात भाजपाचे बळ मोठे आहे.

    भारती पवार व कपिल पाटील हे दोघेही राष्राटीवादी काँग्रेसमधून भाजपात आले आहेत. पवार या तर मागच्या 2019 च्या निवडणुकीतच भाजपात आल्या व थेट खासदार झाल्या आणि आता दोन वर्षांच्या आतच त्यांना मंत्रीपदाची संधी मिळते आहे.

    नाशिक ते नंदुरबार या आदिवासी पट्यात त्यांचे चांगेल काम आहे व त्याचा भाजपाला राजकीय लाभ होऊ शकेल. मात्र त्यांच्या समावेशाने नंदुरबार मधील डॉ विजय गावित समर्थक नाराज होतील ही शक्यता आहे.