Eknath Khadse's apology; He had made a controversial statement about Brahmins while criticizing Fadnavis

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे सर्वत्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहे. मात्र, ठाकरे सरकारने अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. सरकारने यावर्षीदेखील पायी वारीला परवानगी नाकारली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे. राज्य सरकारने वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावांचा विचार करायला हवा होता, असे खडसे यांनी म्हटले आहे.

    जळगाव : राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात आल्यामुळे सर्वत्र निर्बंध शिथिल करण्यात आले आहे. त्यामुळे वारकऱ्यांना पंढरपूरच्या वारीचे वेध लागले आहे. मात्र, ठाकरे सरकारने अटी शर्थींसह परवानगी दिली आहे. सरकारने यावर्षीदेखील पायी वारीला परवानगी नाकारली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावरून राष्ट्रवादीचे नेते आणि माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी खंत व्यक्त केली आहे. राज्य सरकारने वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावांचा विचार करायला हवा होता, असे खडसे यांनी म्हटले आहे.

    पांडुरंगाच्या दर्शनासाठी जगभरातला वारकरी आसुसलेला असतो, आषाढी एकादशीला पांडुरंगाचे दर्शन व्हावे ही वारकऱ्यांची इच्छा असते. परंतु, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून राज्य सरकारला प्रस्ताव अनेक पाठवलेले आहेत. या प्रस्तावाचा विचार झाला असता तर अनेक वारकऱ्यांना पांडुरंगाचे दर्शन घेता आले असते असे एकनाथ खडसे म्हणाले.

    कमी उपस्थितीत पायी वारी करणे शक्य होते. सरकारने थोडा गांभीर्याने विचार करायला हवा होता, अशी प्रतिक्रिया विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मला असे वाटते की कमी उपस्थितीची पायी वारी करता येणे शक्य होते. थोडा सरकारने जर विचार केला असता. तर निश्चितपणे तसे करता आले असते. कारण, वारकऱ्यांनी केवळ 50 लोकांची परवानगी मागितली होती. शिवाय, गावातून कुणीही रस्त्यावर येणार नाही, असा ठरावही घेण्यात आला होता. त्यामुळे वारी इतक्या शिस्तीत पार पडली असती. याचा सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा होता, असे फडणवीस म्हणाले.

    हे सुद्धा वाचा