एकनाथ खडसे हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना, उद्या घेणार राष्ट्रवादीचा झेंडा हाती

मुक्ताईनगर: माजी मंत्री एकनाथ खडसे आज मुंबईला हेलिकॉप्टरने रवाना(eknath khadse gone to mumbai ) झाले असून ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

मुक्ताईनगर: माजी मंत्री एकनाथ खडसे आज मुंबईला हेलिकॉप्टरने रवाना(eknath khadse gone to mumbai ) झाले असून ते उद्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. एकनाथ खडसे हे आज साडेबाराच्या सुमारास हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना होणर असल्याचे आधी सांगण्यात आले होते. तथापि त्यांना जाण्यासाठी थोडा विलंब झाला असून ते दोन वाजेच्या सुमारास हेलिकॉप्टरने मुंबईला रवाना झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी मंदाताई खडसे व कन्या रोहिणी खडसे यादेखील मुंबई येथे गेल्या आहेत.

दरम्यान उद्या दुपारी दोन वाजता एकनाथराव खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असून यावेळी त्यांच्यासोबत दहापेक्षा जास्त माजी आमदार देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची माहिती त्यांनी आज सकाळी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.