एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी खडसे यांना कोरोनाची लागण

रोहिणी खडसे यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आग्रहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या सहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश केलेल्या आणि एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसे (Rohini Khadse ) यांना करोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना तातडीनं जळगावमधील (Jalgaon) एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

रोहिणी खडसे यांनी स्वत: ट्वीट करून ही माहिती दिली आग्रहे. रोहिणी खडसे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रकृती उत्तम आहे. मात्र, खबरदारी म्हणून रुग्णालयात दाखल होत आहे. गेल्या सहा दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी व स्वत:ची काळजी घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.

रोहिणी खडसे या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष आहेत. जळगाव जिल्ह्याच्या राजकारणातही त्या सक्रिय आहेत. रोहिणी खडसे यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देऊन वडील एकनाथ खडसेंसोबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे.