एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी यांना ईडीकडून समन्स; उद्या ईडीसमोर उपस्थित राहा

पुण्यातील भोसरी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी (son-in-law Girish Chaudhary) यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Khadse's wife Mandakini Khadse) यांनाही ईडीने समन्स बजावले होते.

    जळगाव (Jalgaon) : माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते (former minister and NCP leader) एकनाथ खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे यांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. मंदाकिनी खडसे यांना उद्या ईडीसमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणात हे समन्स बजावण्यात आले आहे.

    जावई गिरीश चौधरी ईडीच्या ताब्यात
    यापूर्वी ८ जुलै रोजी एकनाथ खडसे यांची ईडी कार्यालयात ९ तास चौकशी करण्यात आली होती. पुण्यातील भोसरी औद्योगिक वसाहतीमधील भूखंड व्यवहार प्रकरणात जावई गिरीश चौधरी (son-in-law Girish Chaudhary) यांच्या अटकेनंतर खडसेंची चौकशी करण्यात आली होती. त्यावेळी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे (Khadse’s wife Mandakini Khadse) यांनाही ईडीने समन्स बजावले होते. मंदाकिनी खडसे यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, त्यांना एका निवेदनाद्वारे १४ दिवसांची वेळ मागितली होती.