प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

जिल्ह्यात आज सोमवारी ३१९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. माहिती कार्यालयाच्या प्रेस नोटनुसार ही माहिती प्रसारित करण्यात आली. आज दिवसभरात ८० रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५६१७८ आहे.

    जळगाव (Jalgaon).  जिल्ह्यात आज सोमवारी ३१९ कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहेत. माहिती कार्यालयाच्या प्रेस नोटनुसार ही माहिती प्रसारित करण्यात आली. आज दिवसभरात ८० रूग्ण उपचारात बरे होऊन घरी गेले . आतापर्यंत उपचार घेऊन बरे होऊन सुखरूप घरी गेलेले रुग्णांची संख्या ५६१७८ आहे. जळगाव जिल्ह्यात सध्या १३०१ रूग्ण उपचार घेत असून आज दिवसभरात ३१६ नवीन बाधित रूग्ण आढळल्याने एकूण बाधितांची संख्या ५८८५४ झाली आहे. आज पर्यंत १३७५ रूग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

    तालुका निहाय बाधित रुग्णाची आकडेवारी : जळगांव ग्रामीण ०६ , भुसावळ ०१२, अमळनेर २०, चोपडा १८ , पाचोरा ०४, भडगाव ०७, धरणगाव ०४, यावल ०४, एरंडोल ००, जामनेर ०४, रावेर ००,पारोळा ०१,चाळीसगांव ७१, मुक्ताईनगर ०७, बोदवड ००, इतर जिल्ह्यातील ०३ असे रुग्ण बाधित आढळून आले आहेत.