flood in chalisgaon

चाळीसगाव(Flood In Chalisgaon) तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तितुर नदीला पूर आला. या पूराचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुराचा फटका चाळीसगाव भडगाव पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना(Farmer`s Loss Due To Flood) बसला असून पुराचे पाणी शेतात शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    जळगाव : जळगाव(Jalgaon) जिल्ह्यातील चाळीसगाव(Flood In Chalisgaon) तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने तितुर नदीला पूर आला. या पूराचे पाणी घरात शिरल्यामुळे अनेकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पुराचा फटका चाळीसगाव भडगाव पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना(Farmer`s Loss Due To Flood) बसला असून पुराचे पाणी शेतात शिरल्याने अनेक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

    या महापुराचा फटका चाळीसगाव भडगाव पाचोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना देखील बसला असून महापुरामुळे उभी पिके वाहून गेली. कापूस, सोयाबीन, तूर,मूग इत्यादी पिके वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. महापुराच्या आलेल्या पाण्यामुळे या तालुक्यातील रस्ते वाहून गेले आहेत. शेकडो गुरे ढोरे देखील वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेल्यामुळे शेतकरी आता शासनाच्या मदतीकडे डोळे लावून वाट पाहत आहेत. पंचनामा कधी होईल आणि भरपाई कधी मिळेल ? असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावरती निसर्गाच्या घाल्यामुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडून गेले आहे. तात्काळ नुकसान भरपाईचे पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी शेतकरी करत आहेत.