राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुराचं सावट; नद्यांना पूर आल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला

आज राज्यातील अनेक भागात पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. तर जळगावात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानं लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत. सोमवारी रात्रीपासून जळगावात मुसळधार पावसाचं आमगन झालं. अद्याप जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरूच असल्यानं अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं दिसत आहे.

    जळगाव : हवामान खात्याने राज्यात पूढील 3 ते 4 दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. त्यानंतर आता गेल्या काही तासांपासून राज्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे.

    आज राज्यातील अनेक भागात पावसामुळे पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र दिसत आहे. तर जळगावात देखील मुसळधार पावसाने हजेरी लावल्यानं लोकांच्या अडचणी वाढल्या आहेत.

    सोमवारी रात्रीपासून जळगावात मुसळधार पावसाचं आमगन झालं. अद्याप जिल्ह्यातील काही भागात पाऊस सुरूच असल्यानं अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाल्याचं दिसत आहे. चाळीसगाव, भडगाव आणि पाचोरा तालुक्यातील काही भागांमध्ये पाणी तुंबलं असल्याचं देखील दिसतंय. तर गिरणा आणि तितूर या दोन नद्यांना पूर आला आहे.