माजी मंत्री गिरीश महाजन यांना कोरोनाची लागण; संपर्कात आलेल्यांना करोनाची चाचणी करण्याचं केलं आवाहन

माजी मंत्री गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर करोना चाचणी केली असता, मला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले.

    जळगाव : राज्यात करोना विषाणूची दुसरी लाट थैमान घालत असून, पुन्हा एकदा महाराष्ट्रात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यातील काही जिल्ह्याध्ये कडक निर्बंध लावले आहेत. त्यामध्ये आता माजी मंत्री गिरीश महाजन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. दोन दिवसांपूर्वी ताप आल्यानंतर करोना चाचणी केली असता, मला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरीचं कॉरंटाईन होऊन उपचार घेत होतो. पुढील उपचारासाठी लवकरच मुंबई येथील सेंट जॉर्ज शासकीय रुग्णालयात दाखल होणार आहे, असे महाजनांनी सांगितले.

    दरम्यान गेल्या ३-४ दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्यांनी करोनाची चाचणी करून घ्यावी, अशी माझी विनंती आहे. आपणा सर्वांचे प्रेम व आशीर्वाद पाठीशी आहेतच, लवकरच नव्या जोमाने आपल्या सेवेत दाखल होईल, असेही गिरीज महाजन यांनी म्हंटले आहे.