संपूर्ण राज्याला हादरवणारी घटना, चार लहानग्यांची कुर्‍हाडीने गळा चिरुन हत्या

झोपेत असताना चार भावंडांची निर्घृण हत्या झाल्यामुळं सध्या रावेर आणि परिसरात खळबळ उडालीय.

रावेर :  जळगाव जिल्ह्यातील रावेर-बोरखेडा रस्त्यावरील शेत शिवारात चार भावंडांची निर्घृण हत्या (Murder) केल्याचा भयंकर प्रकार आज सकाळी उघडकीस आला. या हत्येमुळे संपूर्ण जिल्हा हादरला आहे. यात दोन बहिणींचा समावेश आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रावेर शहरालगत बोरगाव शेत शिवारात शेख मुस्ताक यांच्या शेतात गेल्या अनेक वर्षांपासून मयताब भिलाला हे पत्नी, दोन मुली आणि तीन मुलांसोबत राहतात. मध्यप्रदेशातील त्यांच्या नातेवाईकाचा मृत्यू झाल्याने दशक्रिया विधीसाठी पत्नी आणि मुलासह ते 15 ऑक्टोबर रोजी मध्यप्रदेशात गेले होते. दरम्यान दोन मुले आणि दोन मुली हे घरीच होते. चारही भावंडे जेवण करून झोपले असता मध्यरात्री अज्ञात व्यक्ती कुऱ्हाडीने वार करून चारही भावंडांची हत्या केली. सकाळी शेतमालक शेख मुस्ताक हे शेतात आले असता घर बंद दिसले. घरात डोकावून पाहिले असता.

चारही मुलांचे मृतदेह आणि रक्ताचा सडा दिसून आला. हा भयंकर प्रकार पाहून शेख मुस्ताक यांनी रावेर पोलीसांना माहिती दिली.