ओळखीचा घेतला गैरफायदा, अल्पवयीन मुलीकडे मागितला किस; पुढे झालं असं की…

दिगंबर हा पीडित मुलीच्या वडिलांचा ओळखीचा आहे. दोघं एकाच ठिकाणी काम करीत असल्याने एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता दिगंबर हा पीडितेच्या घरी आला. त्यावेळी घरात कोणीच नव्हते. ही संधी साधून त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरात प्रवेश केला.

    जळगाव : अल्पवयीन मुलीला किस मागणे दिगंबर शालिग्राम मुकुंदे (वय ३६,रा.एसएमआयटी प्लॉट, निमखेडी रोड, जळगाव) याला चांगलेच महागात पडले असून त्याची थेट कारागृहातच रवानगी झाली आहे. याप्रकरणी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात विनयभंग व पोस्को कायद्यातंर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिगंबर हा पीडित मुलीच्या वडिलांचा ओळखीचा आहे. दोघं एकाच ठिकाणी काम करीत असल्याने एकमेकांच्या घरी येणं जाणं होतं. शुक्रवारी दुपारी साडे चार वाजता दिगंबर हा पीडितेच्या घरी आला. त्यावेळी घरात कोणीच नव्हते. ही संधी साधून त्याने पाणी पिण्याच्या बहाण्याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. गालाला स्पर्श करुन तिला मिठीत ओढले व मला एक किस करु दे म्हणून तिच्याकडे आग्रह केला.

    या प्रकाराने घाबरलेल्या पीडितेने तातडीने वडिलांना फोन करुन माहिती दिली. त्यांनी तिला घेऊन जिल्हा पेठ पोलीस स्टेशन गाठून पोलीस निरीक्षक विलास शेंडे यांच्याकडे झाल्याप्रकाराची माहिती दिली. त्यावरुन गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाधिकारी किशोर पवार यांनी दिगंबर याला अटक केली. शनिवारी न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.

    he asked minor girl to kiss taking advantage acquaintance and