चोपड्यात घरगुती भांडणावरून पतीने केली पत्नीची हत्या; आरोपीला पोलिसांनी केली अटक

    जळगाव : चोपडा शहरातील फुले नगर भागात राहणारे संजय पुंजू चव्हाण वय 48 याने पत्नीसोबत घरगुती भांडणातून लोखंडी विळाने पत्नीच्या मांडीला गंभीर दुखापत केल्याने 40 वर्षी मिराबाई संजय चव्हाण यांच्या अतिरक्तस्रावाने मृत्यू झाला.

    दरम्यान चोपडा शहर पोलीस स्टेशनला आरोपीविरुद्ध 302 चा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली आहे सदर घटना हि काल रात्री घडलेली आहे. अशी माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक चाळीसगाव सचिन गोरे यांनी दिली.