I would commit suicide if I was not given alcohol and gutkha Dhingana of a corona patient at Jalgaon covid Center

या घटनेची माहिती मिळताच महापौर भारती सोनवणे कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्या. महापौरांस इतर अधिकारी आणि कर्मचारी या तरुणाला खडसावत असताना त्याने टेबलावर ठेवलेली गुटख्याची पुडी उचलून पळ काढला आणि स्वतःच्या खोलीत जात आतून कडी लावून घेतली. मद्यपी इतक्यावरच थांबला नाही तर खोलीतून तो पुन्हा पुन्हा आत्महत्येची धमकी देत होता.

    जळगाव : नागरीक बेजबाबदारपणे वागत असल्याने प्रशानचा गोंधळ उडाला असतानाच आता व्यसनी रुग्णांमुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. जळगावातील कोविड सेंटरमध्ये दाखल असलेल्या एका कोरोना रुग्णाने दारू आणि गुटखा मिळावा यासाठी गोंधळ घातला आहे.

    जळगाव शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात सुरू असलेल्या मनपा कोविड केअर सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. इमारत क्रमांक ४ मध्ये हा तरुण बुधवारी सकाळी आईसह उपचारासाठी दाखल झाला होता.

    यावेळी या तरुणाने बाहेरून दारूच्या बाटल्या आणल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्याच्याकडे विचारणा केली असता. मला दारू आणि गुटखा न दिल्यास मी आत्महत्या करेन, अशी धमकी देत या तरुणाने गोंधळ घातला.

    या घटनेची माहिती मिळताच महापौर भारती सोनवणे कोविड सेंटरमध्ये दाखल झाल्या. महापौरांस इतर अधिकारी आणि कर्मचारी या तरुणाला खडसावत असताना त्याने टेबलावर ठेवलेली गुटख्याची पुडी उचलून पळ काढला आणि स्वतःच्या खोलीत जात आतून कडी लावून घेतली. मद्यपी इतक्यावरच थांबला नाही तर खोलीतून तो पुन्हा पुन्हा आत्महत्येची धमकी देत होता.

    महापौरांच्या आदेशानंतर मद्यपीसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मद्यपीकडून दारूच्या ४ बाटल्या, गुटखा जप्त करण्यात आला आहे.