तू मला विसरण्याचा प्रयत्न केलास तर… चिठ्ठी लिहून नववीच्या विद्यार्थिनीने घेतला धक्कादायक निर्णय

सध्या जगभरात व्हॅलेनटाईन वीकची धुम सुरु आहे. त्यातच जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तिने लिहीलेल्या चिठ्ठीत एका मुलाचे नाव लिहून ठेवले आहे.

    जळगाव : सध्या जगभरात व्हॅलेनटाईन वीकची धुम सुरु आहे. त्यातच जळगावात एक धक्कादायक घटना घडली आहे. नववीच्या वर्गात शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. आत्महत्येपूर्वी तिने लिहीलेल्या चिठ्ठीत एका मुलाचे नाव लिहून ठेवले आहे.

    घरात कोणी नसताना या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. तिचे कुटुंबिय घरी परतल्यानंतर मृतदेह घराच्या छताला लटकताना दिसला. तात्काळ तिला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

    या मुलीच्या मृतदेहाजवळ एक चिठ्ठी आढळून आली. ‘आय लव्ह यू ऋषीकेश, तुला माहिती नसेल मी तुझ्यावर किती प्रेम करते. ए ऋषी तू जर मला विसरण्याचा प्रयत्न केलास ना तर …’ अशा मजकूर लिहिला आहे. चिठ्ठीत उल्लेख केलेला ऋषिकेश नेमका कोण आहे? याचा तपास पोलिस करत आहेत.