जळगावात भाजपच्या आमदार सावकारेंच्या फलकावर एकनाथ खडसे यांचे छायाचित्र लागले

मुंबई : भाजप सोडून एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर भाजपचे भुसावळचे आमदारही खडसेंच्या पावलावर पाऊल टाकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आमदार सावकारे यांच्या पोस्टरवर खडसेंचा फोटो झळकल्याने तो चर्चेचा विषय झाला आहे.

भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे  एकनाथ खडसे यांचे खंदे समर्थक मानले जातात. एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर सावकारेही त्यांच्या मागे जाणार का, अश्या चर्चा सुरू झाल्या आहेत. सावकारें पूर्वी राष्ट्रवादीत होते, नंतर ते भाजपात आले मात्र त्यांच्या वाढदिवशी पोस्टरवर खडसेंचे चित्र लागल्याने राजकीय वर्तुळात कुजबूज सुरू झाली आहे. सावकारेंच्या कार्यकर्त्यांनी फक्त एकनाथ खडसे यांचा फोटो लावला. त्यामुळे सोशल मीडियावर तसेच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

खडसे समर्थक पाडवीही राष्ट्रवादीत
नंदुरबार जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी खडसेंच्या आधी राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेतला होता. “खडसेंच्या आदेशानेच मी ९सप्टेंबरला मुंबईला गेलो. तिथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने, जयंत पाटलांनी सांगितल्याप्रमाणे मी राष्ट्रवादीत प्रवेश केला” असे पाडवींनी सांगितले होते.